#MeToo हो, आमचे संबंध होते पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : ''1994 च्यादरम्यान मी आणि पत्रकार पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले होते. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या होत्या. याशिवाय माझ्या कुटुंबातही तेढ निर्माण झाले होते'', असे स्पष्टीकरण माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आज (शुक्रवार) दिले. 

'एशियन एज' या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला होता. त्यानंतर एका वृतसंस्थेशी संवाद साधताना अकबर म्हणाले, ''1994 च्यादरम्यान मी आणि पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले होते. आमच्यातील संबंध काही महिने टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या होत्या. आमच्यातील या संबंधामुळे माझ्या कुटुंबातही तेढ निर्माण झाला होता. परस्पर संमतीने प्रस्थापित केलेले हे संबंध नंतर संपविण्यात आले होते''.

दरम्यान, लैंगिक शोषणाच्या आरोपावरून एम. जे. अकबर यांच्यावर काँग्रेससह विरोधीपक्षांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live