धोनी व्हिलचेअरवर असला तरी त्याला संघात खेळवेन.. कोण म्हणतंय हे पाहा

धोनी व्हिलचेअरवर असला तरी त्याला संघात खेळवेन.. कोण म्हणतंय हे पाहा

मुंबई : महेंद्रसिंग धोनीची जागा सध्या कोणीच घेऊ शकत नाही. त्याच्यासारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे अशक्य आहे. तो 80 वर्षांचा झाला तरी आणि तो व्हिलचेअरवर असला तरी त्याला संघात खेळवेन, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने म्हटले आहे.

धोनीच्या संथ खेळामुळे त्याच्या संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. धोनी 2019 चा विश्वकरंडक खेळेल की नाही याबाबत चर्चा सुरु असताना आणि रिषभ पंतचा संघात समावेश केला असताना डिव्हिलर्सने हे वक्तव्य केले आहे. धोनीला पूर्वीप्रमाणे फलंदाजी करता येत नसल्याने अनेक माजी खेळाडूंकडून त्याच्या संघातील स्थानाबाबत बोलले जात आहे.

डिव्हिलर्स म्हणाला, की तुम्ही सर्व विदूषकासारखा प्रश्न विचारत आहात. मी धोनीला माझ्या संघात प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षाला कायम ठेवीन. तो 80 वर्षांचा झाला आणि तेव्हा तो व्हिलचेअर असला तरी तो माझ्या संघातून खेळेल. त्याच्या कामगिरीला तोड नाही.. त्याच्या विक्रमांवर एकदा नजर टाका. तुम्ही अशा खेळाडूला संघातून वगळू पाहताय? धोनीची यष्टीमागे कामगिरी जबरदस्त आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला अनेकवेळा फायदा झाला आहे. डीआरएस घेण्यात तर त्याच्या कोणीच हात धरू शकत नाही. युवा गोलंदाजांना याची मदत होते.

WebTitle : marathi news m s dhoni ab devillers cricket sports 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com