विधानसभेसाठी इच्छुक आहात.. सोशल मिडियावर ACTIVE व्हा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

भोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर "ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.    

भोपाळ : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेल्या मध्य प्रदेशात कॉंग्रेसने इच्छुकांसमोर सोशल मीडियावर कार्यरत असण्याचे आव्हान उभे केले आहे. फेसबुक आणि ट्‌विटवर "ऍक्‍टिव्ह' असणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले असून, त्याचे निकषही एका पत्रकाद्वारे नमूद केले आहेत.    

विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या कॉंग्रेसजनांना फेसबुकवर "लाइक्‍स', तर ट्विटरवर "फॉलोअर्स' वाढवावे लागणार आहेत. फेसबुकवर कमीतकमी 15 हजार "लाइक्‍स' आणि ट्विटरवर किमान पाच हजार "फॉलोअर्स' असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, नेत्यांना मध्य प्रदेश कॉंग्रेसच्या सर्व ट्विटना लाइक आणि रिट्विटही करावे लागेल, अशी एक अटही आहे. उमेदवारांची यादी तयार करण्यात भाजपवर आघाडी घेण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा आहे.

येत्या 20 सप्टेंबरपर्यंत 70 ते 80 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्याचा पक्षाचा विचार आहे. सातत्याने पराभव होत असलेल्या जागांचाही त्यात समावेश असेल. या संदर्भात उद्या (ता. 4) दिल्लीत निवडणूक समितीची बैठक होणार असून, कॉंग्रेसच्या प्रचार मोहिमेचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह छाननी समितीचे तीन सदस्य या बैठकीस उपस्थित राहतील. छाननी समितीने मान्यता दिलेल्यांची यादी संसदीय मंडळाकडे जाईल आणि तेथून उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल. 

विधानसभा निवडणुकीत तीनपेक्षा जास्त वेळा पराभव झालेल्या 105 जागांवरचे उमेदवार याच महिन्यात जाहीर करण्याचा विचार प्रदेश कॉंग्रेस करीत आहे. यातील 31 जागांवर कॉंग्रेसचा पाचपेक्षा जास्त वेळा, 19 जागांवर चार वेळा, तर 54 जागांवर तीन वेळा पराभव झाला आहे. 

नेते आणि "फॉलोअर्स' 
ज्योतिरादित्य शिंदे 10 लाख 21 हजार 
दिग्विजयसिंह 8,38,000 
कमलनाथ 9,572 

Web Marathi:Madhya Pradesh Congress criteria in Assembly election


संबंधित बातम्या

Saam TV Live