( VIDEO ) अघोरी गोटमार यात्रे दरम्यान 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मध्य प्रदेशाच्या पांढुर्णा येथील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत एकाचा मृत्यू झालाय, तर 226 जण जखमी झालेत. पांढुर्णा आणि सावरगाव येथील नागरिकांमध्ये झालेल्या गोटमारीत २५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय.

तर २२६ जण या प्रकारामुळे जखमी झाले. शंकर भलावी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नावंय. तीनशे वर्षांची ही कुप्रथा बंद करण्यात अपयश येत असल्याने अंधश्रद्धेमुळे यंदाही बळी गेला. या यात्रेत मागील ७१ वर्षांत १२ जण मृत्युमुखी पडले असून हजारो नागरिकांना अपंगत्व आले आहे. 

WebTitle : marathi news madhyapradesh gotmari ritual one died 

संबंधित बातम्या

Saam TV Live