पबजीच्या नादात पाण्याऐवजी पिले अॅसिड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

मध्यप्रदेश: सध्याच्या तरुणाईला पबजी या ऑनलाईन गेमने भांबावून सोडले आहे. पबजी खेळण्याच्या नादात बऱ्याच जणांनी आपला जीव गमावला आहे तर काही जणांनी दुसर्यांचा बळी घेतला आहे. अशा बऱ्याच घटना सातत्याने होताना दिसत आहेत. त्यातच मध्यप्रदेशमध्ये पबजी खेळण्याच्या नादात एका २५ वर्षीय तरुणाने पाण्याऐवजी चक्क अॅसिड प्यायले आहे. या घटनेनंतर तरुणाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. 

       मध्यप्रदेशमधील छिंदवाडा परिसरात २५ वर्षाच्या विवाहित तरुणाने एक महिन्यापूर्वी पबजी खेळताना पिण्याच्या पाण्याऐवजी  अॅसिड पिले. खेळण्यात दंग असताना बाजूला पिण्याच्या पाण्याची बाटली आणि अॅसिडची बाटली यात फरक न समजल्यामुळे हि घटना घडली त्यानंतर पोटात प्रचंड वेदना जाणवल्यामुळे या तरुणाला रुग्णालयात हलवण्यात आले. या तरुणावर आधी मध्यप्रदेश व नंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले. उपचार सुरु असताना देखील या तरुणाने पबजी खेळणे सोडले नाही. या घटनेनंतर दरम्यान, गुजरात सरकारने या गेमवर बंदी घातली आहे. परिक्षांच्या काळात या गेमवर बंदी आणावी अशी विद्यार्थी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांकडे मागणी केली आहे. 

web title:Man playing ‘PUBG’ drinks acid instead of water

संबंधित बातम्या

Saam TV Live