मदरशांतून गोडसे, साध्वीसारखे लोक तयार होत नाहीत'- आझम खान

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

रामपूर : मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे.

रामपूर : मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मदरशे आणि मुख्य शिक्षणाबाबत नव्या योजना लागू करण्याच्या विचारात असल्याबाबत विचारले असता आझम खान यांनी हे वक्तव्य केले. आझम खान यांनी यापूर्वीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतेच महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त असे म्हटले होते. त्यावर देशभर वाद निर्माण झाला होता. आता आझम खान यांनी यावर वक्तव्य केले आहे.

आझम खान म्हणाले, की मदरशांमधून नथुराम गोडसेसारखे कृत्य करणारे आणि प्रज्ञासिंह ठाकूर सारखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती तयार होत नाहीत. नथुराम गोडसेसारखे विचार लोकशाहीसाठी घातक आहेत. असे दहशतवादी कृत्य करणाऱ्यांचा आम्ही कधीही उदोउदो करत नाही. 

Web Title: Madrasas Dont Breed People Like Godse Pragya Thakur says Azam Khan

 


संबंधित बातम्या

Saam TV Live