मॅग्नेटीक महाराष्ट्रमध्ये परवडणाऱ्या घरांबाबत महत्त्वपूर्ण करार..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

परवडणाऱ्या घरांसंदर्भात विकासकांची संघटना असलेल्या 'नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल'ने  सोमवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. यामुळे तीन ते चार वर्षांत मुंबई महानगर परिसरात साडेपाच लाख घरे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. या घरांची किंमत साधारणपणे १५ ते ६० लाखांदरम्यान असेल. यामध्ये 'नरेडको'तर्फे तीन लाख तर MCHIतर्फे अडीच लाख परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.या करारामुळे ही घरे बांधण्यासाठी 'नरेडको'च्या छत्राखालील विकासकांना विविध प्रकारच्या परवानग्या, नोंदणी आणि मंजुरी आदी सोपस्कार जलदगतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे.

परवडणाऱ्या घरांसंदर्भात विकासकांची संघटना असलेल्या 'नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल'ने  सोमवारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला. यामुळे तीन ते चार वर्षांत मुंबई महानगर परिसरात साडेपाच लाख घरे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. या घरांची किंमत साधारणपणे १५ ते ६० लाखांदरम्यान असेल. यामध्ये 'नरेडको'तर्फे तीन लाख तर MCHIतर्फे अडीच लाख परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.या करारामुळे ही घरे बांधण्यासाठी 'नरेडको'च्या छत्राखालील विकासकांना विविध प्रकारच्या परवानग्या, नोंदणी आणि मंजुरी आदी सोपस्कार जलदगतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. साहजिकच गृहनिर्माण प्रकल्प उभारताना प्रत्येक टप्प्यावर होणारी रखडपट्टी टळून प्रकल्प निर्धारित वेळत पूर्ण करणे शक्य होईल. तीन लाख घरे बांधण्यासाठी 'नरेडको' ९० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live