महाबळेश्वरमध्ये ऐन मार्च महिन्यात तापमानाचा पारा ३ अंशांवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

एकिकडे राज्यात उन्हाच्या वाढत्या चटक्यांनी अंगाची लाहिलाही होत असताना दुसरीकडे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मात्र कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळतेय. महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरात रात्री 3 अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद झालीये. हवामानात झालेल्या या अचानक बदलाने सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं असून उन्हापासून दिलासा मिळावा याकरता, महाबळेश्वर गाठलेल्या पर्यटकांची मात्र चांगलीच कोंडी झालीये. पर्यटक गारठले आहेत आणि ऐन उन्हाळ्यात त्यांच्यावर स्वेटर कानटोप्या बाहेर काढण्याची वेळ आली आहे. महाबळेश्वरमधील पर्यटकांना काश्मीरमध्ये बसल्याचा अनुभव येतोय.

एकिकडे राज्यात उन्हाच्या वाढत्या चटक्यांनी अंगाची लाहिलाही होत असताना दुसरीकडे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मात्र कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळतेय. महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरात रात्री 3 अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद झालीये. हवामानात झालेल्या या अचानक बदलाने सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं असून उन्हापासून दिलासा मिळावा याकरता, महाबळेश्वर गाठलेल्या पर्यटकांची मात्र चांगलीच कोंडी झालीये. पर्यटक गारठले आहेत आणि ऐन उन्हाळ्यात त्यांच्यावर स्वेटर कानटोप्या बाहेर काढण्याची वेळ आली आहे. महाबळेश्वरमधील पर्यटकांना काश्मीरमध्ये बसल्याचा अनुभव येतोय. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये प्रथमच मार्च महिन्यात प्रथमच पारा 3 अंशावर आला आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live