महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबई : वांगणीजवळ अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सुमारे 700 प्रवाशांची आज (शनिवार) दुपारी सुखरुप सुटका करण्यात आली. एनडीआरएफ, नौदल आणि पोलिसांची मदतीने या सर्वांची सुटका करण्यात आली असून, प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगावजवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली. या गाडीत सातशे प्रवाशी अडकून पडले होते. मध्यरात्रीपासून अडकलेल्या या प्रवाशांच्या सुटकेसाठी आज सकाळपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु झाले. गेल्या काही तासांपासून प्रवाशी अडकल्याने आणि रुळावर पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले होते. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी NDRF, Navy, अग्निशमन दल, ठाणे, बदलापूर, स्थानिक गावकरी यांची मदत घेण्यात आली.

मध्य रेल्वेनेही ट्विट करत रेल्वे पोलिस महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये असून, घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले होते. रुळाच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीला पूर आल्याने वांगणीजवळ रेल्वे रुळावर पाणी आले. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस तेथेच अडकून पडली. आता सध्याही रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे. 

महालक्ष्मी एक्सप्रेसमधून बाहेर काढलेल्या नागरिकांना रुग्णवाहिकेतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. स्थानिकांची मोठी मदत झाली. प्रवाशांसाठी 14 बसची तयारी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live