मॅटकडून 154 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द; 'त्या' अधिकाऱ्यांना पहाटे ऍकॅडमीमधूनही काढलं बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मॅटने पदोन्नती रोखलेल्या 154 पोलिस अधिकाऱ्यांना नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस ऍकॅडमीमधून पहाटे बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहाटे 5 वाजता त्यांना मुख्यालय सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे पहाटे आपल्या सर्व सामानासह रस्त्यावर वाहन शोधत फिरण्याची नामुष्की जवानांवर ओढवली.

पोलिस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पाहत तब्बल 9 महिने खडतर प्रशिक्षण घेत, पदाची शपथ घेतलेल्या या 154 अधिकाऱ्यांना, आता मूळ शिपाई पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पदोन्नतीतल्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एससी आणि एसटी वर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. तरी, राज्य सरकारला यासंदर्भात लवकरच कायदा करावा लागणार आहे.

कारण राज्य सरकार जोपर्यंत कायदा करत नाही तोपर्यंत पदोन्नतीमधलं आरक्षण बेकायदा आहे असा निर्णय देत मॅटनं राज्य सरकारला दणका दिला. हा निर्णय देताना मॅटनं 154 पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती रद्दही केली. 3 दिवसांपूर्वीचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची शपथ घेतली होती.
 
WebTitle : marathi news maharashtra administrative tribunal cancels promotion of 154 police officers in nashik  

संबंधित बातम्या

Saam TV Live