'महाराष्ट्रात जलील यांचा शब्दच अंतिम'; ओवैंसींनी प्रकाश आंबेडकरांना सुनावलं

'महाराष्ट्रात जलील यांचा शब्दच अंतिम'; ओवैंसींनी प्रकाश आंबेडकरांना सुनावलं

विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातली युती तुटलीय. असदुद्दीन ओवैसींनी याबाबत थेट भाष्य करत प्रकाश आंबेडकरांना सुनावलंय. ओवैसींशिवाय इतर कुणाच्याही बोलण्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना टोला लगावला होता.

जलिल यांना टोला लगावणाऱ्या आंबेडकरांना ओवैसींनी फटकारलंय. महाराष्ट्रात इम्तियाज जलिल यांचाच शब्द अंतिम असेल अशा शब्दात ओवैसींनी आंबेडकरांना सुनावलंय.

ओवैसींशिवाय इतर कुणाशीही बोलणी करायचा प्रश्नच नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेत इम्तियाज जलिलांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.. मात्र ओवैसींनी जलील यांची पाठराखण केल्यानं आंबेडकरांची राजकीय कोंडी झालीय. ओवैसींच्या या भूमिकेमुळे एमआयएम-वंचित युती तुटल्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. आता युती तुटल्याचा फटका एमआयएम आणि वंचित यापैकी कुणाला बसतो हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra asaddudin owaisi prakash ambedkar MIM and VBA alliance 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com