औरंगाबादेत शुकशुकाट ; औरंगाबादमध्ये कडकडीत बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबादमध्य़ेही कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण औरंगाबादेत शुकशुकाट पाहायला मिळतोय. मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन हे शांतिपूर्ण, अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्र, शाळांच्या बस यांना आंदोलनातून वगण्यात आले आहे.

बंदच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी द्यावी, अशी सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे. 10 ऑगस्टपर्यंत मराठा समाजातील तरुणांवर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दाखल केलेले गुन्हे ‘सरसकट’ मागे घेण्यात यावेत. आतापर्यंत 28 जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेले असून त्यांना प्रत्येकी 50 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान क्रांती चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी साडेसात वाजताच भेट दिली. आंदोलन शांततेत करावं, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. तसेच बंद मध्ये शिवसेनेचाही सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live