मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद :  पुण्यात 'आयटीयन्स'ला वर्क फ्रॉम होम'चा पर्याय '

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. आजच्या या बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवत आहे. यातील बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे अतिशय महत्वाचे काम आहे, असे कर्मचारी सकाळी नऊच्या पूर्वीच कंपनीत पोहचत आहेत. तसेच सायंकाळी सहानंतर कंपनीतून बाहेर पडणार आहेत. हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या असून, इथे साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर आजच्या बंदचा परिणाम जाणवत आहे. परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवतोय. बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय अवलंबला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या 131 शाळा बंद करण्यात आले असून, 13 खासगी महाविद्यालय बंद नेहमीच ट्रॅफिक जाम असलेला पुणे-मुंबई जुना महामार्गावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live