अंतर्गत धुसफूस आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

वैदेही काणेकर आणि अमोल कविटकर 
गुरुवार, 13 जून 2019

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनमधला अंतर्गत कलह उफाळून आल्याचं बोललं जातंय. मंत्रिपदासाठी शिवसेनेत लॉबिंग सुरु झाल्याचं समजतंय. भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाईंच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, सुभाष देसाईंच्या नावाला आमदारांकडून विरोध होतोय. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व आमदार एकवटले असून त्यांनी मातोश्रीवर योग्य तो संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितल जातंय. मात्र, मंत्रिमंडळ विस्तावरुन शिवसेनेत कोणतीही नाराजी नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतायेत

शिवसेनेसोबतच भाजपमध्येही धुसफूस पाहायला मिळतय. मंत्रिपदं तसंच उपमुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत विस्तार नकोच अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे आयात नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने दोन्ही पक्षात अंतर्गत कलह सुरू झालाय.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वाद शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना परवडणारे नाहीत...त्यामुळं नाराजांची संख्या कमी करत  मंत्रिमंडळ विस्तारात करण्याचे मोठं आव्हान शिवसेना-भाजप नेतृत्वासमोर असणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra cabinet expansion internal conflicts in BJP and Shivsena 

संबंधित बातम्या

Saam TV Live