शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला शहांनी लावला सुरूंग? 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

रविवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विधानसभेसाठीचा रोडमॅप निश्चित केला गेलाय. मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी जसं काम केलंत, तसंच भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी कामाला लागा. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्यासाठीही तितकीच मेहनत करण्याच्या सूचना शहांनी दिल्यात.  

भाजपच्या या बैठकीनंतर शिवसेनेत मात्र अस्वस्थता आहे. एकिकडे शिवसेनेसोबत युतीच्या आणाभाका घ्यायच्या आणि दुसरीकडे आपल्या फायद्याचा अजेंडा रेटत रहायचा, ही भाजपची दुटप्पी भुमिका शिवसेनेला रुचलेली नाही. या आधीही चंद्रकांत पाटलांनी युतीच्या फॉर्म्युल्यावर  केलेल्या वक्तव्यानेही शिवसेनेत नाराजी होती.

युतीच्या जागावाटपाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नसल्याने भाजपच्या या बैठकीत त्यावर विशेष चर्चा झाली नाही. मात्र विधानसभेत शिवसेनेपेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांना शहांनी सुरूंग लावल्याची चर्चा आहे. 

Web Title : marathi news maharashtra CM big statement of amit shah for shivsena and their dream of having CM 

संबंधित बातम्या

Saam TV Live