उत्तर भारतातून येणाऱ्या थंड प्रवाहांमुळे महाराष्ट्रात ठंडा.. ठंडा.. कूल.. कूल..   

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. 

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वारे, पूर्वेकडील उष्ण व बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात गुरुवारपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी झालेल्या गारपिटीने पिकांचे नुकसानही झाले. रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोली येथे १७.४ मिलीमीटर, तर चंद्रपूरात २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलके ढग जमा झाले होते. तर उत्तर महाराष्ट्रात गारठा चांगला वाढला होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ६.६ अंश सेल्सिअस तर नाशिक मध्ये ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही तापमानात घट झाली असून, किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पश्चिमी चक्रावातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हीमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश परिसरामध्ये किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे

संबंधित बातम्या

Saam TV Live