महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 1666 वर, तर मृतांची संख्या 115

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

 एकट्या मुंबईत 72 नव्या रुग्णांची भर पडलीय. अकोल्यात एका कोरोनाग्रस्तानं आत्महत्या केलीय. तर धुळ्यात 2 तर कराड आणि वसईतही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय..

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 1666 वर गेलाय. तर सकाळपासून 5 रुग्णांचा राज्यात मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा 115 वर पोहोचलाय. एकट्या मुंबईत 72 नव्या रुग्णांची भर पडलीय. अकोल्यात एका कोरोनाग्रस्तानं आत्महत्या केलीय. तर धुळ्यात 2 तर कराड आणि वसईतही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. याशिवाय आज मालेगावात 5, ठाण्यात 4, औरंगाबाद, नाशिक आणि पनवेलमध्ये प्रत्येकी दोन तर कल्याण, पालघर, अहमदनगर, वसई-विरार आणि पुण्यात प्रत्येकी 1-1 रुग्ण वाढलाय.

सकाळपासून हाती आलेल्या माहितीनुसार आणखी 5 कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले असून त्यापैकी एक रुग्णाने आत्महत्या केलेली आहे.अकोल्यात एका कोरोना बाधित रुग्णाने गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या केली. हा कोरोना बाधित रुग्ण हा आसाम मधील असून काल या रुग्णाचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला होता. धुळ्यात दोन मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी एक रुग्ण धुळ्याचा असून दुसरा रुग्ण मूळचा मालेगावचा आहे. मालेगावचा रुग्ण ही 22 वर्षीय तरुणी असून तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, कराड आणि वसईत आज एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालाय. सरकारच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात 110 मृत्यूंची नोंद होती. त्यात आणखी पाचने वाढ होऊन आता ही संख्या 115 वर पोहोचलीये.

Web Title - marathi news maharashtra corona updates 


संबंधित बातम्या

Saam TV Live