वेगळ्या विदर्भाची मागणी करत महाराष्ट्र दिनी विदर्भवासियांनी पाळला काळा दिवस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. पण विदर्भात मात्र हा काळा दिवस म्हणून साजरा झाला. विदर्भ राज्य आघाडीतर्फे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तसंच वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते ऍडव्होकेट श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या विदर्भाचा ध्वज फडकावण्यात आला. वेगळ्या विदर्भाची मागणी करत, विदर्भप्रेमींनी जनता महाविद्यालय येथे विदर्भ राज्याचे ध्वजारोहण केले. संयुक्त महाराष्ट्रातून विदर्भ राज्य वेगळे करा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची विदर्भवाद्यांची मागणी आहे.

आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. पण विदर्भात मात्र हा काळा दिवस म्हणून साजरा झाला. विदर्भ राज्य आघाडीतर्फे महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. तसंच वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते ऍडव्होकेट श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या विदर्भाचा ध्वज फडकावण्यात आला. वेगळ्या विदर्भाची मागणी करत, विदर्भप्रेमींनी जनता महाविद्यालय येथे विदर्भ राज्याचे ध्वजारोहण केले. संयुक्त महाराष्ट्रातून विदर्भ राज्य वेगळे करा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची विदर्भवाद्यांची मागणी आहे. या मागणीसाठी 1 मे महाराष्ट्र दिनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अशोक जीवतोड़े यांच्या नेतृत्वात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. विदर्भ राज्य झालेच पहिजे, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.. तसंच  ज़िल्हयात ठिकठिकाणी प्रतीकात्मक ध्वजारोहण करण्यात आले.


संबंधित बातम्या

Saam TV Live