मराठी अनुवाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून माफीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाचे मराठीमध्ये अनुवाद न झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माफी मागितली. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले.

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी मराठीत अनुवाद न झाल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत उपस्थित करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. संबंधित बाब ही गंभीर असून, आज त्यांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद न होणे ही बाब गंभीर आहे. याविषयी खुद्द शिक्षणमंत्री तावडे यांना अनुवाद करावा लागला त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांना घरी पाठवले पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्य्यक्षांकडे केली. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्यात येईल असे सांगतानाच या प्रकारणी त्यांनी सभागृहाची माफी मागितली.

या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केली. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. आजचा प्रकार हा सर्वांना कमीपणा आणणारा आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुवाद करते वेळी अध्यक्ष सभापती यांची परवानगी घेतली होती का हा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live