(VIDEO) दिवाळीत निघणार दिवाळं..

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. फराळ बनविण्यासाठी लागणाऱया डाळी, रवा-मैद्यापासून ते कपडे, आकाशकंदिलापर्यंत सर्वच गोष्टी 15 ते 20 टक्क्यांनी महागल्याने सर्वसामान्यांचे पुरते दिवाळे निघण्याची वेळ आली आहे. डाळींचे आणि तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत डालडा 90 रुपयांवरून 110 रुपयांवर पोहोचला आहे, तर खाद्यतेलही प्रतिलिटर 15 ते 20 रुपयांनी महागले आहे. सनफ्लॉवर तेलाच्या पिशवीसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत. या पिशवीचे दर गतवर्षी 110 रुपये होते.

वाढलेल्या किराणा मालाच्या दर पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ.. 

WebTitle : marathi news maharashtra diwali and increased inflation  

संबंधित बातम्या

Saam TV Live