महागडा कांदा महाराष्ट्राला नको!

महागडा कांदा महाराष्ट्राला नको!

मुंबई - केंद्र सरकारने आयात केलेला कांदा उचलण्यास राज्य सरकारने नकार दिला असून, राज्यातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारचा आयात महागडा कांदा महाराष्ट्राला नको, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना पाठवले आहे. यामुळे केंद्र सरकारने आयात केलेल्या कांद्याचा नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातच केंद्राने आयात केलेल्या कांद्याला धुमारे फुटले असल्याने तो खराब प्रतिचा बनल्याचेही सांगण्यात येते.

केंद्र सरकारने इजिप्त, तुर्की आणि इतर काही देशांतून डिसेंबरमध्ये कांदा आयात केला होता. १७ डिसेंबरला केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून आयात कांदा राज्याचे उचलण्याची शिफारस केली होती. नाफेडने ६ डिसेंबरला राज्य सरकारला १०० टन कांदा उचलण्यास कळवले. त्यासाठी राज्य सरकारने जेएनपीटीच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया सुरू केली. एक किलोची पिशवी तयार करून केंद्राच्या दराप्रमाणे प्रतिकिलो ८० रुपये हा कांदा विकण्याचे नियोजन होते. या काळात कांद्यांचे दर शंभर रुपयांपेक्षाही जास्त होते. मात्र, दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या बाजारात राज्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे कांद्याचे खरेदी दर घसरले आहेत.

साधारणत: ३७ ते ६७ रुपयांच्या दरम्यान कांद्याचे दर कमी झाल्याने आयात कांदा घेण्यास राज्य सरकारने नकार कळवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अगोदर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागानेदेखील केंद्राला महाराष्ट्राला आयात कांद्याची आवश्‍यकता नसल्याचे कळवले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने राज्य सरकारने आयात कांदा उचलण्यासाठी विनंती केली आहे.

Web Title maharashtra does not want expensive onions

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com