कांदा अनुदानास मुदतवाढ.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

मुंबई -  कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कांदा अनुदानासाठी एक नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. कांद्याला मिळणारा बाजारभाव 15 डिसेंबरनंतरही कमी असल्याने कांदा अनुदानासाठीचा 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

देशमुख म्हणाले, की राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये एक नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 200 रुपये प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रतिशेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 15 डिसेंबर 2018 नंतरही कांद्याच्या दराची घसरण कायम राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. याबाबत शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्थी या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही देशमुख यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live