साहेब माझी किडनी घ्या पण बियाणं द्या.. 

साहेब माझी किडनी घ्या पण बियाणं द्या.. 

एका शेतकऱ्यानी चक्क सरकारकडे किडनीच्या बदल्यात बियाण्यांची मागणी केलीये. या करुण मागणीवरुन भीषण दुष्काळाची दाहकता समजू शकते. नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याने मायबाप सरकारला ही आर्त विनवणी केलीय. सततचा दुष्काळ, भेगाळलेली जमीन, भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी वणवण. हिंगोली जिल्ह्याचं सध्याचं हे ह्रदयद्रावक चित्र. 

गेल्या तीन वर्षांपासून हिंगोलीत पाऊस बरसलाच नाही. पाण्याअभावी उभी पिकं जळून गेलीत. कर्जाचा बोजा वाढला. आर्थिक चणचण भासू लागलीय. आता तर पेरणीसाठी बियाणे, खतासाठी पैसेच उरले नाहीत. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱी आर्थिक अडचणीत सापडलाय.

नामदेव पतंगे यांच्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱी सध्या आर्थिक अडचणीत सापडलेत. सरकारच्या पीकविमा, पीककर्ज, दुष्काळी अनुदानाच्या योजनांचाही त्यांना लाभ मिळालेला नाही. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दुष्काळाने मेटाकुटीला आलाय. त्याला पुन्हा उभारी घ्यायचीय. मायबाप सरकारकडून त्याला आधाराची गरज आहे तर आणि तरच तो पुन्हा एकदा ताठ मानाने उभा राहिल.   

WebTitle : marathi news Maharashtra farmer ask seeds in return of his kidneys

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com