महाराष्ट्रात दीड लाख हेक्‍टरवर चारा लागवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सोलापूर : पावसाअभावी यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून दीड लाख हेक्‍टरवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आता जिल्हानिहाय क्षेत्राची माहिती मागविली आहे.

सोलापूर : पावसाअभावी यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून दीड लाख हेक्‍टरवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आता जिल्हानिहाय क्षेत्राची माहिती मागविली आहे.

राज्यातील बहुतांशी धरणे, बंधारे, लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचीही टंचाई भासणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे. 2012 नंतर यंदा पुन्हा राज्यातील पशुगणना सुरू करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच टॅबद्वारे पशुगणना करण्याचे निर्देश असून त्याचा कालावधी 1 ऑक्‍टोबर ते 31 डिसेंबर असा आहे. चारा छावण्या सुरू करण्याऐवजी शेतकऱ्यांना थेट चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ठळक बाबी... 
- चारा लागवडीसाठी 25 कोटींचा खर्च अपेक्षित 
- 2012 नंतर आता प्रथमच नव्याने टॅबद्वारे पशुगणना 
- 31 डिसेंबरपर्यंत पशुगणना करण्याचे शासनाचे निर्देश 
- सोलापूर जिल्ह्यात जनावरांची संख्या 15 लाख 20 हजार 482 
- राज्यात सुमारे पावणेदोन कोटी देशी व संकरित गायी, म्हशी, बैल यासह अन्य प्रकारची जनावरे 

राज्यात दुष्काळाची दाहकता पावसाअभावी वाढत आहे. जूनपर्यंत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात चारा लागवड किती क्षेत्रावर करावी लागणार आहे, याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्याला मोफत बियाणे देऊन चारा लागवड केली जाईल.

WebTitle : marathi news maharashtra fodder plantation over one and half hectors of area 


संबंधित बातम्या

Saam TV Live