आता सावकारी कर्जही माफ होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 मार्च 2020

राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेत बँकांकडील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आता मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्जही अदा करण्याची घोषणा शासनानं केली आहे.

मुंबई - राज्य सकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतऱ्यांनी घेतलेलं सावकारी कर्ज माफ कऱण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ही कर्जमाफी करण्यासाठी शासनाकडून 65 कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे.

हे ही वाचा - पुण्याचा तरुण ठरला, जगातली सर्वोत्तम आई!

राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेत बँकांकडील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आता मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्जही अदा करण्याची घोषणा शासनानं केली आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचवेळी मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.

हे ही पहा - 

 

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. तसेच येथील शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे सातत्यानं दुष्काळाचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना अनेकवेळा बँकांनी कर्ज नाकारले होते. त्यामुळे त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. अशा शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाने त्यांनाही आर्थिक मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. 

Web Title maharashtra gov. announce farmer Debt forgiveness


संबंधित बातम्या

Saam TV Live