सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या TOP 10 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील आठ खासदार
नाशिक - लोकसभेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचतर्फे सोळाव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. त्यानुसार सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या "टॉप-टेन'मध्ये महाराष्ट्रातील आठ खासदारांचा समावेश आहे. त्यात बारामतीच्या खासदारांनी एक हजार 181 प्रश्न विचारून अव्वलस्थान पटकावले आहे.
नाशिक - लोकसभेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचतर्फे सोळाव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. त्यानुसार सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या "टॉप-टेन'मध्ये महाराष्ट्रातील आठ खासदारांचा समावेश आहे. त्यात बारामतीच्या खासदारांनी एक हजार 181 प्रश्न विचारून अव्वलस्थान पटकावले आहे.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये कोल्हापूरचे धनंजय महाडिक, माढ्याचे विजयसिंह मोहिते-पाटील, कॉंग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव आडसूळ, भाजपच्या डॉ. हीना गावित यांच्यासह उत्तर प्रदेशातील दोन खासदारांचा समावेश आहे. त्यापैकी श्री. मोहिते-पाटील, श्री. सातव हे आताची निवडणूक लढवत नाहीत.
संसद अधिनियम 1954 च्या वेतन, भत्ते आणि पेन्शननुसार सर्व सदस्यांना दररोज भत्ता मिळविण्यासाठी प्रत्येक बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, संसदेचे अधिकारी आणि पंतप्रधान यांचा खासदार म्हणून समावेश होत नाही. दरम्यान, सोळाव्या लोकसभेत मांडलेल्या 273 पैकी 240 विधेयके मंजूर झाली. दहा विधेयके मागे घेण्यात आली असून, 23 विधेयके प्रलंबित आहेत. 562 खासदारांनी सरासरी 251 प्रश्न विचारले असून, 312 पैकी 221 बैठकांमध्ये सहभागी झाले. दिल्लीतील सात खासदारांची सर्वाधिक सरासरी 289 बैठकांसाठी उपस्थिती राहिली.
नागालॅंडमधील दोन खासदार कमी उपस्थित होते. त्यांची सरासरी 88 बैठकांसाठी उपस्थिती होती. महाराष्ट्रातील 48 खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारले असून, प्रत्येकाचे सरासरी 534 प्रश्न राहिले. नागालॅंडच्या दोन खासदारांच्या प्रश्नांचे प्रमाण कमी म्हणजे सरासरी 12 इतके राहिले.
याशिवाय, राजकीय पक्षांमध्ये भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या दोन खासदारांची सर्वाधिक म्हणजे सरासरी 264, तर नॅशनल पीपल्स पार्टीच्या दोन खासदारांची सर्वांत कमी म्हणजे 85 बैठकांसाठी उपस्थिती होती. शिवसेनेच्या 18 खासदारांनी सर्वांत जास्त म्हणजे, प्रत्येकाने सरासरी 639, तर नॅशनल पीपल्स पार्टीच्या दोन खासदारांनी सर्वांत कमी म्हणजे 10 प्रश्न विचारले आहेत. भाजपचे बंदामधील भैरोनप्रसाद मिश्रा हे 312, तर सोनिपतचे रमेश कौशिक 311, तर महाराष्ट्रातील गोपाळ शेट्टी 311, किरीट सोमय्या 301, डॉ. सुनील गायकवाड 302, शिवसेनेचे अरविंद सावंत 307 बैठकांसाठी उपस्थित राहिले.
उत्तर महाराष्ट्राची स्थिती
- खासदारांचे नाव विचारलेले प्रश्न बैठकांसाठी उपस्थिती
- डॉ. हीना गावित 1 हजार 96 255
- डॉ. सुभाष भामरे 218 122
- हरिश्चंद्र चव्हाण 643 272
- हेमंत गोडसे 441 274
- ए. टी. पाटील 509 269
- दिलीप गांधी 314 212
- सदाशिव लोखंडे 536 230
- रक्षा खडसे 492 232