महाराष्ट्र देशात सर्वात 'हॉट'  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

एप्रिल महिन्यात यंदा राज्यात उष्म्याने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार चंद्रपूर, वर्धा, मालेगाव, ब्रह्मपुरी, अकोला आणि परभणी या सहा ठिकाणी यंदा सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. यातील काही ठिकाणी सलग 16 दिवस उष्णता थाण मांडून बसली होती. ही केवळ सहा ठिकाणेच नाहीत, तर देशाच्या हवामानाचा विचार करता यंदाच्या एप्रिलमध्ये देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्येही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. उष्ण हवामानाच्या या तडाख्यामुळे नागरिक हैराण होत असतानाच फळबागायती करणार्‍या शेतकर्‍यांनाही मोठा तडाखा बसला आहे.

एप्रिल महिन्यात यंदा राज्यात उष्म्याने कहर केला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार चंद्रपूर, वर्धा, मालेगाव, ब्रह्मपुरी, अकोला आणि परभणी या सहा ठिकाणी यंदा सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. यातील काही ठिकाणी सलग 16 दिवस उष्णता थाण मांडून बसली होती. ही केवळ सहा ठिकाणेच नाहीत, तर देशाच्या हवामानाचा विचार करता यंदाच्या एप्रिलमध्ये देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्येही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. उष्ण हवामानाच्या या तडाख्यामुळे नागरिक हैराण होत असतानाच फळबागायती करणार्‍या शेतकर्‍यांनाही मोठा तडाखा बसला आहे. कोकणात फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत उन्हाबरोबर सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडी मुक्‍काम करून होती. यामुळे काही ठिकाणी आंब्याचा मोहोर जळून गेला. आंब्याबरोबर उन्हाचा मोठा तडाखा टोमॅटोला बसला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live