जोरदार पावसामुळे महाराष्ट्रभरात 30 पेक्षा अधिकांनी गमावला जीव

जोरदार पावसामुळे महाराष्ट्रभरात 30 पेक्षा अधिकांनी गमावला जीव

मुंबई : मुंबई पुणे, नाशिकसह राज्यात पावसाचा कहर सुरुच असून, या शहरांमध्ये भिंती कोसळण्याच्या घडलेल्या घटनांमुळे तब्बल 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात पाऊस होत असला तरी मुंबई आणि पुण्यात पावसाचा जोर आहे. त्यामुळे या दुर्घटना घडल्या आहेत.

मालाडमध्ये भिंत कोसळून 19 ठार
मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बचावकार्य अद्याप सुरु असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे. वनखात्याची संरक्षण भिंत कोसळली. टेकडीवर बांधलेल्या काही झोपडपट्ट्यांवर ही भिंत कोसळली. एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे.

आंबेगावमध्ये सीमाभिंत पडून 6 मजुरांचा मृत्यू
पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावल्याची घटना आंबेगाव परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. कोंढवा परिसरात शनिवारी सिमाभींत पडून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांत ही घटना घडली आहे.

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू
कल्याणमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची सिमाभींत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून तिघांचा मृत्यू
नाशिकच्या सातपूर भागात बिल्डर सुजॉय गुप्ता यांच्या सुरू असलेल्या नवीन बांधकाम प्रकल्पाची पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली तर एक गंभीर जखमी आहे. मृतांत महंमद बारीक (वय 32 रा बिहार), बेबी सनबी खातून (वय 28 रा बिहार) दोघे मजूर आहेत, एका महिलेचा समावेश आहे.

WebTitle : marathi news maharashtra heavy rain updates more than 30 people lost their lives 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com