(VIDEO) प्रतापगडावर डोळ्याचं पारणं फेडणारा मशाल महोत्सव

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

358 वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आई भवानी मातेच्या मंदिराची स्थापना केली. नेपाळच्या गंडकी नदीतून शाळीग्राम दगडातून ही भवानी मातेची मूर्ती घडवली गेली.

जेव्हा या गोष्टीला साडे तीनशे वर्षं पूर्ण झाली तेव्हापासून या शिवपराक्रमांची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर मशाल महोत्सव मोठया दिमाखात साजरा केला जातो. दरवर्षी एकेक मशाल वाढवून हा मशाल महोत्सव साजरा केला जातो.

देशभरातून या मशाल महोत्सवाला पर्यटक येत असतात. आता या मशाल महोत्सवानं एक वेगळीच उंची गाठलीय. 

WebTitle : marathi news maharashtra heritage pratapgadh mashal mohotsav 

संबंधित बातम्या

Saam TV Live