बैलगाडा शर्यतीच्या मार्गातील अडथळा दूर होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

बैलाची शरीररचना घोड्यासारखी नसली, तरी बैलदेखील धावू शकतो. बैल हा घोड्याच्या वेगाने धावू शकत नसला तरी प्रशिक्षण दिलेला खिलार जातीचा बैल वेगाने धावू शकतो, असा अहवाल प्राणी तज्ज्ञ समितीने दिला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या मार्गातील अडथळा आता दूर होण्याची शक्यताय. बैलाची शरीररचना घोड्यासारखी नसली, तरी बैलदेखील धावू शकतो. बैल हा घोड्याच्या वेगाने धावू शकत नसला तरी प्रशिक्षण दिलेला खिलार जातीचा बैल वेगाने धावू शकतो, असा अहवाल प्राणी तज्ज्ञ समितीने दिला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतींसमोर असलेला महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्याताय. 

सर्वोच्च न्यायालयासमोर राज्य सरकार हा अहवाल सादर करणार आहे. घोड्यांच्या शर्यतीप्रमाणे बैलाच्या स्पर्धांना देखील परवानगी मिळावी, असा युक्तिवाद केला जाणार आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेले नियम हेदेखील पुरेसे असल्याचा शेरा या अहवालात मारण्यात आला आहे. प्राण्यांना इजा होत नसल्याची खात्री करून घेतल्यास बैलगाडी शर्यत घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्टपणे या अहवालात म्हटले आहे.

WebLink : marathi news maharashtra hurdle between bull racing may get clear soon 


संबंधित बातम्या

Saam TV Live