ऑक्सिजनवर असलेल्या वृध्देने बजावला मतदानाचा हक्क

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

विटा - सांगली लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यापासून अॉक्सिजनवर असलेल्या गार्डी ( ता. खानापूर ) येथील 85 वर्षांच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. श्रीमती कुसूम सुबराव बाबर असे या वृध्द महिलेचे नाव आहे. 

विटा - सांगली लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यापासून अॉक्सिजनवर असलेल्या गार्डी ( ता. खानापूर ) येथील 85 वर्षांच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला. श्रीमती कुसूम सुबराव बाबर असे या वृध्द महिलेचे नाव आहे. 

या वृद्ध महिलेने मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी  त्यांना गावातील सौरभ बाबर, हेमंत बाबर, सतीश पाटील, रोहित गुरव, संतोष बाबर, बालाजी बाबर या तरूणांनी घरातून चारचाकी गाडीतून अॉक्सिजनसह मतदान केंद्रात आणले. तेथे कुसूम यांनी मतदानाचा हक्क बजावला. आजारी असूनसुध्दा त्यांनी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलेच पाहिजे. असे तेथे उपस्थित असणा-या अधिकारी व मतदारांना सांगितले. काहीजण धडधाकट असूनसुध्दा मतदान करण्यास टाळाटाळ करतात. कुसूम यांनी अॉक्सिजनवर असतानाही मतदानाचा हक्क बजावून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे.

Web Title: marathi news maharashtra loksabha 2019 lady on oxygen casted her vote 

संबंधित बातम्या

Saam TV Live