मान्सून संदर्भात आणखी एक महत्त्वाची आणि वाईट बातमी..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

केरळमध्ये मान्सूनचं गेल्या आठवड्यात आगमन झालं. केरळामध्ये मान्सून आगमन झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या सरी लवकरच बरसण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, वायू चक्रिवादळामुळं त्यांच्या आशांवर पाणी फेरलंय. वायू चक्रीवादळामुळं राज्यातील मान्सूनच्या आगमनावर परिणाम झालाय.

वायू वादळामुळं राज्याला आणि शेजारच्या गुजरातवर विशेष हानी झाली नसली तरी वायू चक्रीवादळामुळं राज्यात मान्सूनचं आगमन मात्र रखडलंय. आता मान्सून मुंबईत दाखल होण्यास एक दोन नव्हे तर सात दिवस लागण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. 20 जूनपर्यंत तळकोकणात मान्सूनच्या सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

राज्यात सध्या भीषण दुष्काळाचं चित्र आहे. तसंच उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा पावसाकडे लागल्यात. आता ही मान्सूनची ही प्रतिक्षा लवकर संपो आणि लवकरात लवकर मान्सून बरसो अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

WebTitle : marathi news maharashtra monsoon again delayed monsoon update 

संबंधित बातम्या

Saam TV Live