राज्यात प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे - राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली असून, प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. सर्वाधिक कमाल तापमान अमरावती येथे ३७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानात २.१ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३३.८ अंश सेल्सिअस नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे रविवारी देण्यात आली. 

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.

राज्यात रविवारी दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता, त्यामुळे कमाल तापमानात वाढ नोंदली गेली. यामुळे २७ पैकी १२ शहरांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. अमरावती, जळगावमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पुढील चोवीस तासांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

WebTitle : marathi news maharashtra october heat global warming weather 

संबंधित बातम्या

Saam TV Live