प्लास्टिक वापरताय? 5 हजार खिशात ठेवा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांनो सावधान! तुम्ही प्लास्टिक पिशव्या वापरत असाल तर किमान पाच हजार रुपये दंड भरण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. 23 जूनपासून प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

आता प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, टोप्या, ग्लास, स्ट्रॉ आणि प्लास्टिक प्लेट वापरता येणार नाही.

सध्या अस्तित्वात असलेलं प्लास्टिक जमा करण्यासाठी मुंबई महापालिकेनं टोल फ्री क्रमांक दिलाय. शिवाय प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी 225 पालिका कर्मचाऱ्यांची फौज तैनात केलीय.

प्लास्टिक पिशवी वापरताना किंवा विकणाऱ्याला पहिल्यांदा 5 हजार दंड, दुसऱ्यांदा सापडली तर 10 हजार दंड, तिसऱ्यांदा पकडले गेल्यास 25 हजारांचा दंड आणि 3 महिन्यांचा तुरूंगवासाची तरतूद करण्यात आलीय.

प्लास्टिकबंदी होत असली तरी तिची अंमलबजावणी किती प्रभावणीपणे होते यावर त्याचं यश अवलंबून आहे. अन्यथा ही प्लास्टिकबंदीही एक सरकारी आदेशच बनून राहण्याची भीती व्यक्त केली जातेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live