सरकारनं कायदा करून तातडीनं राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याची गरज - मोहन भागवतांची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीचा उत्सव सुरू आहे. या कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारनं कायदा करत तात्काळ राम मंदिर उभारावं अशी मागणी केलीय. तर त्यातल्या त्यात चांगल्या पक्षाला मतदान करण्याचंही आवाहन त्यांनी केलंय. स्वयंसेवकांचं पथसंचलन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थीसुद्धा उपस्थित होते.
 
दसऱ्याचा मुहूर्त साधत विविध राजकीय पक्ष आपापली भूमिका स्पष्ट करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यातून, हिंदुत्वाचा एल्गार करीत राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निकराचा हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. या मेळ्याव्यात उद्धव ठाकरे त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याची तारीख घोषित करणार आहेत. तसंच शिवसेना पुन्हा स्वबळाचा नारा देणार का याचीही प्रत्येकाला उत्सुकता लागून आहे. 

त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षांनंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट येथे स्थलांतरीत केलेल्या ‘दसरा’ मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मेळावा राजकीय विरोधाबरोबरच पक्षांतर्गत नेतृत्व स्पर्धेत प्रभाव टाकणारे ‘शक्तीपीठ’व्हावे यासाठी गर्दीचा उच्चांक मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

WebTitle : marathi news maharashtra political vijayadashmi shivsena RSS pankaja munde 

संबंधित बातम्या

Saam TV Live