विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

राजू सोनावणे साम टीव्ही मुंबई
शनिवार, 29 जून 2019

फडणवीस सरकारचं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे. त्यानंतर म्हणजे येत्या तीन-चार महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. अर्थात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत लोकप्रिय घोषणा केल्या. यामध्ये मुंबई,पुणे, नाशिकमधील महत्त्वाच्या प्रकल्पांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलीय.

  • मुंबई मेट्रो -3चा पहिला टप्पा 2021मध्ये पूर्ण करणार
  • मेट्रो-3 चा दुसरा टप्पा जून 2022मध्ये पूर्ण करणार  
  • नवी मुंबई मेट्रो प्रकल्प 2020मध्ये पूर्ण करणार
  • वसई-भाईंदरला जोडणारा खाडी पूल बांधणार
  • मुंबई -पुणे हायपरलूपच्या 15 किमा लांबीच्या प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन करणार
  • कोस्टल रोडमुळे कुठलाही कोळीवाडा बाधित होणार नाही
  • इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022ला पूर्ण कऱणार

राज्यात सत्तेची गणित मांडताना मुंबई, पुणे,नवी मुंबई  ही शहरं खूप महत्त्वाची आहे...त्यामुळे या सगळ्या घोषणा पाहता काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Webtitle :  marathi news maharashtra politics cm fadnavis in house on various projects 

संबंधित बातम्या

Saam TV Live