शिवसेनेला 'पटक देंगे' असं म्हटल्यानंतर, संजय राऊत याचं अमित शाह यांना सडेतोड प्रत्युत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला 'पटक देंगे' असे म्हटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे वाघाचे काळीज आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

लातूर येथील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला अंगावर घेतले. शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक. नाही झाली तर शिवसेनेला 'पटक देंगे, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला होता युती झाली तर मित्राला जिंकवू. नाही झाली तर शिवसेनेला अस्मान दाखवू, असं वक्तव्य अमित शहा यांनी केले होते. शिवसेनेसोबत युती नाही झाली तरी ४८ पैकी ४० जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील ही तयारी भाजप कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

यावर ट्विट करत संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावटयांच्या इशारयांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच 'पटकवले' आहे. इतक्या लवकर विसरलात?

संबंधित बातम्या

Saam TV Live