अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना सोडणार उपमुख्यमंत्रिपदावर पाणी ?

अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना सोडणार उपमुख्यमंत्रिपदावर पाणी ?

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपनं शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळून आली. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, शिवसेनेतल्या आमदारांच्या एका गटाचा सुभाष देसाईंच्या नावाला विरोध होता. यातूनच एकनाथ शिंदेंसाठी या नाराज गटानं मातोश्रीवर लॉबिंग सुरू केलं. ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दारानं आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद दिलं जात असल्यानं आमदारांमधला असंतोष वाढला. यातूनच आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधत एकनाथ शिंदेंनी २५ आमदारांसह मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन केलं. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं बोललं जातंय. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत उद्धव यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालंय. मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्यानं आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादा भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत. आता यातल्या कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारंय. 

WebTitle : marathi news maharashtra politics shivsena not ho claim deputy cm post 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com