येत्या दोन दिवसांत राज्यात पाऊस होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

येत्या दोन दिवसांत राज्यात पाऊस होण्याची शक्यताय. मुंबई आणि गोव्यासह संपूर्ण राज्यात २० ते २२फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडं राहील. तर २३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.

येत्या दोन दिवसांत राज्यात पाऊस होण्याची शक्यताय. मुंबई आणि गोव्यासह संपूर्ण राज्यात २० ते २२फेब्रुवारी दरम्यान हवामान कोरडं राहील. तर २३ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. आधीच गारपीटीनं शेतकऱी हवालदिल झालेले असतात, त्यात पाऊस झाल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यताय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live