पुढील 3 दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

राज्यात सर्वत्र मान्सूनने जोर धरलाय. मुंबईसह राज्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून उकाड्यातून नागरिकांची सुटका केली आहे. तर, पेरणीसाठी रखडलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

पुढील 3 दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवास राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहू शकतो.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live