महाराष्ट्र नव्हे 'घात'राष्ट्र.. इथे दररोज होतात 37 मृत्यू !

मंगेश सौंदाळकरसह ब्युरो रिपोर्ट
सोमवार, 7 मे 2018

राज्यात सर्वात जास्त 130 ब्लॅकस्पॉट नाशिकमध्ये आहेत. तर ठाण्यात 97, कोल्हापुरात 84 नांदेडमध्ये 87 आणि साताऱ्यात 84 ब्लॅकस्पॉट आहेत. 

महाराष्ट्रातले रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत. अपघात झाला नाही असा राज्यात एकही दिवस जात नाही. रस्ते अपघातातल्या मृत्यूंची संख्या पाहिली तर ती विमान अपघातांपेक्षाही कितीतरी पटीनं अधिक आहे. पोलिसांनी राज्यातले1275 ठिकाणं अपघातप्रवणं असल्याचं जाहीर केलंय. ज्या ठिकाणी अपघातात 10 पेक्षा जास्त मृत्यू होतात तो ब्लॅक स्पॉट ठरतो. वर्षभरात महाराष्ट्रात 500 ब्लॅकस्पॉट वाढले असून आता राज्यात 1275 ब्लॅक स्पॉट झालेत. 

राज्यात सर्वात जास्त 130 ब्लॅकस्पॉट नाशिकमध्ये आहेत. तर ठाण्यात 97, कोल्हापुरात 84 नांदेडमध्ये 87 आणि साताऱ्यात 84 ब्लॅकस्पॉट आहेत. 

वाहनांची संख्या जशी वाढतेय तसं अपघातांचं प्रमाणही वाढलंय. खराब रस्ते, बेदरकारपणे वाहनं चालवणं, वाहतुकीची लेन न पाळणे, दारू पिऊन गाडी चालवणे ही कारणं अपघातामागची आहेत. आता हे अपघात कमी कसे होतील याकडं बांधकाम विभागानं लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय वाहतुकीलाही शिस्त लावण्याचं आव्हान पोलिस दलासमोर आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live