राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 1018, सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 एप्रिल 2020

राज्यातील कोरोना रूग्णांनी हजाराचा आकडा पार केलाय.लराज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 1018 झालीय.. काल दिवसभरात राज्यात 150 रूग्ण वाढलेत.

राज्यातील कोरोना रूग्णांनी हजाराचा आकडा पार केलाय... राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 1018 झालीय.... काल दिवसभरात राज्यात 150 रूग्ण वाढलेत. मुंबईत सर्वाधिक 116, पुणे 18, अहमदनगर 3, बुलडाणा 2, ठाणे 2, नागपूर 3, सातारा 1, औरंगाबाद 3, सांगली 1, रत्नागिरीत 1 नवा रूग्ण आढळलाय. दिवसभरात 12 कोरोना रूग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत 6, पुण्यात 3, नागपूर, मीरा भाईंदर आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झालाय.

राज्यात 9 मार्चला पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर प्रत्येक दिवशी कोरोनच्या संसर्गाचे निदान होऊ लागले. एक महिन्याच्या आतच राज्यात कोरोनाबाधित 1 हजार 18 रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागात झाली. राज्यात 12 कोरोना बाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला.  मृत्यू झालेल्या कोविड बाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी 6 मुंबईत, 3 पुण्यात तर प्रत्येकी एक मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 100 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे बाधितांचा आकडा 590 वर पोहोचला. त्यापैकी बहुतेक रुग्ण वरळी, प्रभादेवी, दादर, धारावी, गोवंडी, अंधेरी या भागांतील असल्याचे समजते. नव्या 100 रुग्णांपैकी 55 जण प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांच्या संपर्कात होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरी घेतलेली शोधमोहीम, दवाखाने आणि संशयित रुग्णांच्या चाचणीतून ही माहिती समोर आली.

3000 पथक

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साताऱ्यात 214 सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत 34, सांगलीत 31, रत्नागिरीमध्ये 39 आणि जळगावमध्ये 48 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे तीन हजार 492 सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live