या 'स्टेट को-ऑप. बॅंके'ला झालंय 316 कोटींचा नफा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई - राज्यातील जिल्हा बॅंकांची शिखर बॅंक असलेल्या "दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बॅंके'ला गेल्या आर्थिक वर्षात 316 कोटींचा नफा झाला आहे. 107 वर्षांच्या इतिहासात बॅंकेची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापुढे किरकोळ बॅंकिंग सेवेत विस्तार करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाने गुरुवारी आर्थिक वर्षाच्या कामगिरीची माहिती दिली. 

सरलेल्या आर्थिक वर्षात बॅंकेच्या ठेवी 15 हजार 840 कोटी, कर्जे 19 हजार 700 कोटी आणि एकूण व्यवसाय 35 हजार 540 कोटी इतका झाला आहे. बॅंकेच्या स्वनिधीतही भक्कम वाढ झाली असून, तो चार हजार कोटींवर पोचल्याचे बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. ते म्हणाले की, ""राज्य शासनाकडून थकहमीपोटी मिळणाऱ्या 1 हजार 49 कोटींमुळे बॅंकेचा स्वनिधी पाच हजार कोटींपर्यंत जाईल. परिणामी बॅंकेसाठी शासकीय आणि निमशासकीय संस्थांकडून ठेवी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी व्यापारी बॅंकांसमवेत सहभाग कर्ज योजनेत सहभागी होण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. त्याशिवाय वैयक्तिक कर्ज, वाहनकर्ज आदी किरकोळ बॅंकिंग सेवा सुरू करणार आहे.'' 

चालू वर्षात जळगाव, उस्मानाबाद, जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी सात नव्या शाखा सुरू करण्यात येतील. सहकारी साखर कारखान्यांकडे बॅंकेची सुमारे 2 हजार 300 कोटींहून अधिक थकबाकी आहे. आर्थिक वर्षात बॅंकेने एकाही बुडीत कर्जाचे निर्लेखन केलेले नाही, अशी माहिती अनास्कर यांनी दिली. 

सहकार विद्यापीठ सुरू करणार 
सहकारी चळवळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी बॅंकेकडून सहकार विद्यापीठ सुरू करण्यात येईल. यासाठी सोलापूर येथे दहा एकर जागा बघितली आहे. या माध्यमातून सहकारी संस्थांमधील सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. ही संस्था बॅंकेच्या निधीतून सुरू केली जाईल, असे अनास्कर यांनी सांगितले. 

Web Title: marathi news the maharashtra state co op bank earned profits of 316 crores 

संबंधित बातम्या

Saam TV Live