दिवाळीत एसटी करणार सरसकट १० % भाडेवाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

दररोज होणारी इंधन दरवाढ, त्याचबरोबर वाढलेल्या महागाईत सर्वसामान्य भरडला जातोय. यातच आता दिवाळीत एसटी प्रवाश्यांचं दिवाळं काढणार आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही गर्दीच्या हंगामात म्हणजेच दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटी सरसकट १० % भाडेवाढ करणार आहे. ही भाडेवाढ ती केवळ १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान म्हणजेच २० दिवसांसाठी लागू असेल.

मागील वर्षी याच काळात सेवाप्रकार निहाय २०, १५ आणि १०% भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० % भाडेवाढ करण्यात आलीय. 

WebTitle : marathi news maharashtra state transport  fare hike in Diwali season 

संबंधित बातम्या

Saam TV Live