ST ची 'रातराणी' झाली अधिक आरामदाई; रातराणीत आता स्लीपर बर्थ

 ST ची 'रातराणी' झाली अधिक आरामदाई; रातराणीत आता स्लीपर बर्थ

मुंबई - एसटी महामंडळ आता 30 आसने आणि 15 'स्लीपर बर्थ' असलेल्या दोनशे रातराणी बसची बांधणी करणार आहे. महामंडळाने या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरवात केली असून, एप्रिल महिन्यापर्यंत या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

आतापर्यंत एसटीच्या काही "शिवशाही' बसमध्ये "स्लीपर बर्थ' होते. आता रातराणी बसमध्येही प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन खात्याच्या नियमानुसार ही सुविधा असलेल्या बस वातानुकूलित असणे अनिवार्य आहे; मात्र आपल्या बिगरवातानुकूलित बसमध्ये "स्लीपर बर्थ' ठेवण्याची परवानगी महामंडळाने घेतली आहे. महामंडळाने 1,300 बसची बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 700 गाड्यांसाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra state transport ratrani bus now upgraded with sleeper births  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com