रक्षाबंधनसाठी ST सोडणार जादा बसेस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मुंबई : रक्षाबंधन आणि स्वांतत्र्यदिन उद्या (गुरुवार) साजरा केला जाणार आहे. या रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 ऑगस्ट यादरम्यान ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. 

रक्षाबंधननिमित्त भाऊ आपल्या बहिणीकडे किंवा बहिण आपल्या भावाकडे जात असतात. त्यासाठी रेल्वे किंवा एसटीचा पर्याय हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आता ही गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने रक्षाबंधननिमित्त जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

WebTitle : marathi news maharashtra state transport to run extra buses on rakshabandhan

संबंधित बातम्या

Saam TV Live