कोरोनामुळं राज्याच्या तिजोरीला भगदाड, तब्बल 35 हजार कोटींचा तोटा

कोरोनामुळं राज्याच्या तिजोरीला भगदाड, तब्बल 35 हजार कोटींचा तोटा

कोरोनाच्या लॉकडाऊननं राज्याच्या तिजोरीला मोठं भगदाड पाडलंय. कोरोनाच्या टाळेबंदीत सगळे आर्थिक व्यवहार ठप्प आहे. य़ा सगळ्याचा फटका राज्याच्या तिजोरीलाही बसलाय. राज्याच्या महसुली उत्पन्नात तब्बल ३५ हजार कोटींची घट झालीय. उद्योग, व्यापार, घरांची खरेदी, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच माध्यमातून सरकारला उत्पन्न मिळतं. मागील वर्षी सरकारला यातून 42 हजार कोटींचा महसूल मिळाला होता. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळं फक्त 17 हजार कोटींचा महसूल मिळालाय. म्हणजेच तब्बल 35 हजार कोटींचा फटका. यातील 25 हजार कोटींची फटका एकट्या मार्च महिन्यात बसलाय. अर्थात आता केंद्र सरकारकडून याची भरपाई अपेक्षित आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकार ती भरपाई कधी देईल हेही निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळं चिंता वाढलीय.

गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून 38 हजार 66 कोटींची अपेक्षा होती. पण त्यात 436 कोटी रुपये कमी मिळाले. मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू  सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.

पाहा सरकारच्या तिजोरीत नेमका कसा फरक पडला - 

Web Title - marathi news The maharashtra state treasury loss by Rs 35,000 crore
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com