महाराष्ट्रातील 13 शहरांचा पारा चाळिशीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी (ता. 30) पूर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यातील 13 शहरांमध्ये कमाल तापमान चाळिशी पार गेल्याने उन्हाच्या चटक्‍याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील लोहगाव, जळगाव, मालेगाव आणि सोलापूर येथे उन्हाचा चटका वाढला आहे. पुण्यात कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले. मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड येथे, तर अकोला, ब्रम्ह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ या शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. 

राज्यात येत्या शुक्रवार (ता. 29) पर्यंत मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्‍यता आहे. शनिवारपासून पावसाला पोषक हवामान होत असल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुण्याचा पारा वाढणार 
पुण्यात पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले जाईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. शहरात कमाल तापमानाचा पारा तीन अंश सेल्सिअसने वाढून 39.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर, लोहगाव येथे कमाल तापमानाने चाळिशी गाठली. पुण्यातील किमान तापमान 18.6 अंश, तर लोहगाव येथे 21.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live