तिकीट कापलं तरीही खडसे, तावडे भाजपचे स्टार प्रचारक, जाणून घ्या आणखी कोण कोण आहेत या यादीत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली. 

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी आज (शुक्रवार) जाहीर झाली. या चौथ्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पक्षाकडून स्टार प्रचारांची घोषणा करण्यात आली. 

भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी 'मिशन महाराष्ट्र' हाती घेतले आहे. त्यानुसार स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर नेतेमंडळींची नावे आहेत.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासह इतर नेतेमंडळींच्या नावांचा समावेश आहे. 

एकनाथ खडसे यांच्या नावाचाही समावेश

माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचाही समावेश या स्टार प्रचारकाच्या यादीत आहे. खडसे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. त्यातच आता त्यांचा स्टार प्रचार म्हणून समावेश झाला आहे.

विनोद तावडेही स्टार प्रचारक

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. आज झालेल्या चौथ्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे आता विनोद तावडे यांच्याकडे स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे आहेत भाजपचे स्टार प्रचारक

- पियूश गोयल
- प्रकाश जावडेकर
- वसुंधराराजे सिंधिया
- स्मृती इराणी
- व्ही. सतीश
- सरोज पांडे
- शिवराजसिंह चौहान
- मुख्तार अब्बास नक्वी
- योगी आदित्यनाथ
- भुपेंद्र यादव
- केशवप्रसाद मौर्य
- लक्ष्मण सवदी
- पुरुषोत्तम रुपाला
- विजय रुपानी 
- किसन रेड्डी

- रावसाहेब दानवे-पाटील

- सुधीर मुनगंटीवार
- पंकजा मुंडे-पालवे
- गिरीष महाजन
- आशिष शेलार
- डॉ. रणजीत पाटील
- विजयराव पुराणिक
- पूनम महाजन राव
- विजया रहाटकर
- सुजीतसिंह ठाकूर
- पाशा पटेल
- विजय गीरकर
- माधवीताई नाईक
- प्रसाद लाड
- हरिश्चंद्र बोये


संबंधित बातम्या

Saam TV Live