महाराष्ट्राचं लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही वाढण्याची शक्यता

मोहिनी सोनार
शनिवार, 4 एप्रिल 2020

"महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढवलं जाऊ शकतं" असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेत. मुंबई आणि शहरी भागातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता त्यांनी आज व्यक्त केली.

"महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढवलं जाऊ शकतं" असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेत. मुंबई आणि शहरी भागातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता त्यांनी आज व्यक्त केली.

सर्वाधिक कोरोनाग्रस्त आणि मृतांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्या दृष्टीने महााराष्ट्रात अधिक सतर्कता आणणं महत्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचं संकेत टोपेंनी दिलेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपतोय. मात्र महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिलाय.

काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन १४ एप्रिलपेक्षा जास्त वाढणार नाही असे संकेत दिले होते. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांनी काही सुचनाही केल्या होत्या. मात्र, महाराष्ट्राची परिस्थिती काही सुधारायचं नाव घएत नाहीय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याची चिन्हं आहेत. 

साधारण राज्याचा लॉकडाऊन आणखी ३० एप्रिलपर्यंत असू शकतो. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन नवीन रुग्ण सपडतायत. मुंबईली तर कोरोनानं चांगलंच पछाडलंय. मुंबईतले तब्बल १४६ प्रभाग सील करण्यात आलेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार ह निर्णय घेऊ शकत. दरम्यान राज्य मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार जर लॉकडाऊन आणखी वाढला तर, राज्याचं आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title - 


संबंधित बातम्या

Saam TV Live